शेळ्या सांभाळताना पोलिसांची दमछाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:59 IST2017-10-13T00:59:51+5:302017-10-13T00:59:51+5:30

भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथे शेख अन्सार यांच्या घरासमोरून बुधवारी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांची मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे.

Police taking care of the goats! | शेळ्या सांभाळताना पोलिसांची दमछाक !

शेळ्या सांभाळताना पोलिसांची दमछाक !

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथे शेख अन्सार यांच्या घरासमोरून बुधवारी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांची मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
पोलिसांनी या शेळ्या एका टेम्पोमध्ये भोकरदन येथील गोशाळेत आणल्या. यातील एका शेळीने बुधवारी रात्री पिलाला जन्म दिला. शेळ्यांसह जनावरांचा सांभाळ करणे कठीण जात असल्याने गोशाळेच्या संचालकांनी गुुरुवारी सकाळी पोलिसांना सर्व शेळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे सध्या एका खाजगी व्यक्तीच्या शेडमध्ये या शेळ्या ठेवण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police taking care of the goats!