‘त्या’ घटनास्थळाची केली पोलिस पथकाने पाहणी
By Admin | Updated: April 4, 2016 00:36 IST2016-04-04T00:21:53+5:302016-04-04T00:36:23+5:30
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे विहिरीत संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेह प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

‘त्या’ घटनास्थळाची केली पोलिस पथकाने पाहणी
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे विहिरीत संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेह प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
आव्हाना येथील हिरालाल कायटे यांचामृतदेह १४ फेबु्रवारी रोजी गावातील समाधान गावंडे यांच्या शेतातील विहीरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तपासानंतर त्यांची ओळख पटली होती. याप्रकरणी प्रथम भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मयत हिरालाल कायटे यांची बहिणीने भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाऊ हिरालालचा मृत्यू हा अचानक झालेला नसून त्यांचे सासरे विजय धोंडू शेवगण यांनीच त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मयत हिरालाल हा गरीब व बेरोजगार होता. मुलीशी फारकत करून घेण्यासाठी सासरा वारंवार त्रास देत होता. तसेच १४ फेबु्रवारी पूर्वीच दोन तीन दिवसा अगोदर त्यास मारले असावे असा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी विजय शेवगण यांच्याविरूद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे यांच्यासह पोलिसांच्या एका पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली.