पोलिसांकडून ८ तलवारी, १ गुप्ती जप्त, चार ग्राहकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:33+5:302021-07-07T04:06:33+5:30

औरंगाबाद : अमृतसर येथील अरमान ट्रेडर्सकडून गुपचूप शस्त्रे खरेदी करणाऱ्या दानिश खान कडून तलवारी खरेदी करणाऱ्या चार ग्राहकांना जिन्सी ...

Police seize 8 swords, 1 secret, arrest 4 customers | पोलिसांकडून ८ तलवारी, १ गुप्ती जप्त, चार ग्राहकांना अटक

पोलिसांकडून ८ तलवारी, १ गुप्ती जप्त, चार ग्राहकांना अटक

औरंगाबाद : अमृतसर येथील अरमान ट्रेडर्सकडून गुपचूप शस्त्रे खरेदी करणाऱ्या दानिश खान कडून तलवारी खरेदी करणाऱ्या चार ग्राहकांना जिन्सी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडून ८ तलवारी आणि एक गुप्ती पोलिसांनी हस्तगत केली.

राशेद सालमीन दिप (२२,रा. इंदिरानगर), शेख अरबाज शेख शेरू(२१,रा. इंदिरानगर), फैजान हारूण कुरेशी (२०,रा.पुष्पक गार्डन, चिकलठाणा) आणि मोहमंद फरदीन मोईन बागवान (१९,रा. इंदिरानगर,बायजीपुरा),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी इरफान खान ऊर्फ दानिश खान पठाण याने अमृतसर येथील अरमान ट्रेडर्स या शस्त्र विक्रेत्यांकडून ऑनलाइन तलवार, कुकरी, गुप्ती आदी प्राणघातक शस्त्रे खरेदी करून कुरिअरमार्फत मागवून विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. ३ जुलै रोजी पोलिसांनी त्यास पकडल्यानंतर त्याच्याकडून ४९ शस्त्रे जप्त केली होती. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान त्याने त्याच्याकडून शस्त्रे खरेदी करणाऱ्यांची नावे पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक सरवर शेख, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर आणि अय्युब पठाण, संपत राठोड आणि कर्मचाऱ्यांनी चार ग्राहकांना अटक केली. आरोपी सय्यद मुजाहेद ऊर्फ मुज्जू सय्यद हबीब (रा.किराडपुरा) याला दोन तलवारी विकल्याचे सांगितले. पोलिसांनी मुजाहेदच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता तेथे दोन तलवारी आढळून आल्या. आरोपी अटकेच्या भीतीने पळून गेल्याचे समोर आले. जालीदर्गाजवळ राहणारा अबुजर खान जफर खान याच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्या. तो सुद्धा फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. काल दिवसभरात पोलिसांनी आणखी ८ तलवारी आणि एक गुप्ती अशी ९ प्राणघातक शस्त्रे जप्त केली. या गुन्ह्यात जप्त झालेल्या शस्त्रांची संख्या ५८ झाली.

Web Title: Police seize 8 swords, 1 secret, arrest 4 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.