पोलीस भरतीत उमेदवाराला बनवेगिरी नडली

By Admin | Updated: June 23, 2014 00:31 IST2014-06-23T00:05:54+5:302014-06-23T00:31:22+5:30

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी स्वत: सामोरे न जाता आपल्या नावावर मित्राला मैदानात उतरविणाऱ्या उमेदवाराची बनवेगिरी उघडकीस आली.

Police recruitment was made in the recruitment of the candidates | पोलीस भरतीत उमेदवाराला बनवेगिरी नडली

पोलीस भरतीत उमेदवाराला बनवेगिरी नडली

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी स्वत: सामोरे न जाता आपल्या नावावर मित्राला मैदानात उतरविणाऱ्या उमेदवाराची बनवेगिरी उघडकीस आली. बेगमपुरा पोलिसांनी बनवेगिरी करणाऱ्या उमेदवारास अटक केली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, आयुक्तालयातील मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये शनिवारी विजय बालचंद घुसिंगे (२४, रा. किनगाववाडी, पो. रोहिलागड, ता. अंबड) या उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी होती.
आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरात ५ किलोमीटर धावण्याची चाचणी होती. मात्र, ऐनवेळी विजय मुराडे याने त्यात उतरण्यास नकार दिला. मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणून तो गावी निघून गेला. त्यामुळे विजय घुसिंगे याची मोठी पंचाईत झाली. तो आज सकाळी विद्यापीठ परिसरात गेला. पोलिसांनी त्याचे प्रवेशपत्र तपासले. मात्र, लॅपटॉपवर त्याच्या क्रमांकावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी विजय घुसिंगे यास विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने शनिवारी माझ्याऐवजी मित्र विजय मुराडे याने शारीरिक क्षमता चाचणी दिल्याचे कबूल केले.
त्यानुसार उपनिरीक्षक धर्मराज देशमुख यांनी बेगमपुरा ठाण्यात विजय घुसिंगेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. बेगमपुरा ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष हिवराळे यांनी आरोपी उमेदवारास अटक केली असून, ते पुढील तपास करीत आहेत.
स्वत: मैदानात न उतरता मित्राला उतरविले
विजय घुसिंगे याने स्वत: शारीरिक क्षमता चाचणीला सामोरे न जाता त्यासाठी आपला मित्र विजय प्रल्हाद मुराडे (२२) यास मैदानात उतरविले. त्यासाठी घुसिंगे याने प्रवेशपत्रावर मुराडेचा फोटो लावला. मुराडे हा काल शनिवारी सकाळी मैदानात उतरला. त्याने १०० मीटर धावणे, गोळाफेक व पूलअप्स या सर्व चाचण्या बिनबोभाट दिल्या. त्यात तो ५ किलोमीटर धावण्यासाठी निवडला गेला.

Web Title: Police recruitment was made in the recruitment of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.