पोलिस भरती : ३१९ महिला उमेदवार पात्र

By Admin | Updated: June 12, 2014 01:38 IST2014-06-12T01:06:58+5:302014-06-12T01:38:59+5:30

उस्मानाबाद : येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत बुधवारी महिला उमेदवारांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या.

Police recruitment: 319 women candidates eligible | पोलिस भरती : ३१९ महिला उमेदवार पात्र

पोलिस भरती : ३१९ महिला उमेदवार पात्र

उस्मानाबाद : येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत बुधवारी महिला उमेदवारांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. यासाठी बोलाविलेल्या ७५० उमेदवारांपूर्वी ५०५ महिलांनी उपस्थिती लावली. तर यातील ३१९ महिला चाचणीत उत्तीर्ण तर १८६ अपात्र ठरल्या.
१४० पदांसाठी ६ जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी उपस्थित असलेल्या ५०५ महिला उमेदवारांची प्रारंभी मूळ कागदपत्र व उंचीची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत १८६ उमेदवार अपात्र ठरल्या. यानंतर पात्र ठरलेल्या ३१९ उमेदवारांची लांब उडी, गोळा फेक, शंभर मीटर धावणे आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. या उमेदवारांची गुरूवारी सकाळी पाच वाजता विमानतळाजवळील रोडवर तीन किमी धावण्याची चाचणी होणार आहे.
शुक्रवारी निकाल
सदरील भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल १३ जून रोजी सकाळी आठ वाजता पोलिस कवायत मैदानावर घोषित करण्यात येणार आहे. तसेच पोलिस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर आणि ‘उस्मानाबाद पोलिस डॉट कॉम’ या वेबसाईटवरही तो प्रसिध्द केला जाणार आहे. यासाठी येताना उमेदवारांनी ओळखपत्र सोबत आणावे. यावेळी उमेदवारांना पुढील लेखी परीक्षेबाबतही सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Police recruitment: 319 women candidates eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.