पालममध्ये तीन ठिकाणी पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:08 IST2017-11-10T00:08:39+5:302017-11-10T00:08:51+5:30
तालुक्यात पारवा, फरकंडा आणि शहर परिसरात ७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी देशी दारु व गुटखा पकडला आहे.

पालममध्ये तीन ठिकाणी पोलिसांचे छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : तालुक्यात पारवा, फरकंडा आणि शहर परिसरात ७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी देशी दारु व गुटखा पकडला आहे.
पारवा ते भोगाव या रस्त्यावर ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांनी ९८८ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या १९ बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी नामदेव राठोड यांच्या फिर्यादीवरुन त्र्यंबक नारायण काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. फरकंडा येथे दारु विक्री करणाºया एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करीत देशी दारुच्या ४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात व्यंकटी रुस्तुम पौळ याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पेठपिंपळगाव रस्त्यावर पालम चौकात पोलिसांनी १४ हजार ६३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत सय्यद महमद अली, साहेना पठाण, दत्ता रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गणी खान, पोलीस निरीक्षक रविंद्र बोरसे, उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव, नामदेव राठोड, मुरकुटे, पाटोदे आदींनी ही कारवाई केली.