चंदनझिरा येथे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
By Admin | Updated: February 4, 2017 00:51 IST2017-02-04T00:48:38+5:302017-02-04T00:51:02+5:30
जालना : चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारला

चंदनझिरा येथे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
जालना : चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक आणि चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी छापा मारून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिला आणि कुंटणखाना चालविणारा विशाल शिवाजी बिलाडे याला ताब्यात घेतले.
या परिसरात वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी याची खात्री करून घेतली.
दुपारी पोलिसांनी छापा मारला यात दोन महिलांसह विशाल बिलाडे याला ताब्यात घेतले. घटनस्थळावरून रोख रक्कम, दोन मोबाईल असा सात हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुंटणखाना चालविणारा बिलाडे याच्याविरूध्द घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगत आहेत. आरोपीविरूध्द पिठा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरू होती.
दरम्यान, मंठा चौफुली जवळ चार दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाने एका कुंटणखान्यावर छापा टाकला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शुक्रवारी चंदनझिरा भागातील कुंटनखान्यावर कारवाई केली. यामुळे आता शहरात अवैधपणे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे व आंबट शौकिनांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)