पोलिसांची २६ रिक्षांवर कारवाई

By Admin | Updated: May 8, 2016 23:33 IST2016-05-08T23:14:04+5:302016-05-08T23:33:49+5:30

जालना : शहरातील परवाना, कागदपत्रे , बॅचबिल्ला नसलेल्या २६ रिक्षांवर रविवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत १४ हजार रूपयाचा दंड वसूल केला.

Police raid 26 rakes | पोलिसांची २६ रिक्षांवर कारवाई

पोलिसांची २६ रिक्षांवर कारवाई


जालना : शहरातील परवाना, कागदपत्रे , बॅचबिल्ला नसलेल्या २६ रिक्षांवर रविवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत १४ हजार रूपयाचा दंड वसूल केला. या करवाईने रिक्षा चालकांत खळबळ उडाली होती.
शहरातील सावरकर चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, गांधी चमन आदी परिसरात विना परवाना चालत असलेल्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी कारवाई केली. ज्या रिक्षाचालकांकडे कागदपत्रे होते. परंतु त्याचे नुतनीकरण करण्यात आले नसल्याने त्यांना पाचशे रूपये दंड तर ज्यांच्याकडे कागदपत्रेच नव्हते अशा रिक्षा चालकांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. दिवसभर केलेल्या कारवाई वाहतूक पोलिसांनी चौदा हजार रूपये दंड वसूल केला. ही मोहीम दोन दिवस सुरू राहणार आहे.

Web Title: Police raid 26 rakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.