लाच घेताना पोलिस चतुर्भूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2016 01:15 IST2016-09-30T00:54:43+5:302016-09-30T01:15:33+5:30
जालना : अंबड तालुक्यातील राणीउंचेगाव येथील तरूणाच्या मृत्यूस जबाबदार असल्याची धमकी देवून त्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना अंबडच्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

लाच घेताना पोलिस चतुर्भूज
जालना : अंबड तालुक्यातील राणीउंचेगाव येथील तरूणाच्या मृत्यूस जबाबदार असल्याची धमकी देवून त्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना अंबडच्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविंद्र चव्हाण असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील राणीउंचेगाव येथील एका तरूणाचा १९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद घेण्यात आली होता. त्या तरूणाच्या मृत्यूस तुम्हीच दोघे जबाबदार असल्याचे तक्रारदार यांना सागून या प्रकरणात तुमच्याविरूद्ध गुन्हा दाखल करायचा आहे. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी अंबड पोलिस ठाण्याचे ना.पोकॉ. रविंद्र चव्हाण यांनी केली होती.
दरम्यान तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यावरून लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावण्यात आला. अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात २५ हजाराची लाच घेताना पो. कॉ. चव्हाण यास रंगहाथ पकडण्यात आले.