अनधकिृत नळ जोडणी तोडणीसाठी सिडकोला हवेय पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:29 IST2019-06-01T23:29:33+5:302019-06-01T23:29:49+5:30
अनधिकृत नळजोडणी तोडण्यासाठी १२ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येत असून, यासाठी सिडकोने पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

अनधकिृत नळ जोडणी तोडणीसाठी सिडकोला हवेय पोलीस संरक्षण
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथून गेलेल्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडून त्यावर सिमेंटचा थर बसविण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. अनधिकृत नळजोडणी तोडण्यासाठी १२ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येत असून, यासाठी सिडकोने पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
सिडको अधिसूचित क्षेत्रातील सारा सार्थक, दिशा कुंजबन, द्वारकानगरी, सारा व्यंकटेश, सारा आकृती, सारा किर्ती या नागरी वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी वडगाव कोल्हाटी रस्त्यावरुन जलवाहिनी टाकली आहे.
या जलवाहिनीवर शंभरपेक्षा अधिक अनधिकृत नळजोडणी आहे. जलवाहिनीची चाळणी झाल्याने सिडकोतील बहुतांश वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनधिकृत नळजोडणी निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने ती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यातील पाणीचोरी रोखण्यासाठी जलवाहिनीला सिमेंटचा थर लावण्यात येणार आहे.