पोलीस गस्त चौकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:27+5:302021-01-16T04:05:27+5:30
पीसीआर मोबाईल कार आणि कर्मचाऱ्यांची संख्या घटली पोलीस नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष रिपोर्टिंग करणाऱ्या गस्तीवरील पीसीआर मोबाईल कारची संख्या १२ ...

पोलीस गस्त चौकट
पीसीआर मोबाईल कार आणि कर्मचाऱ्यांची संख्या घटली
पोलीस नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष रिपोर्टिंग करणाऱ्या गस्तीवरील पीसीआर मोबाईल कारची संख्या १२ वरून ९ करण्यात आली. पीसीआर कारवर कार्यरत १० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. काहीजण साप्ताहिक सुटी आणि रजेवर असतात, तर अनेक जण हजेरी मेजरला मदतनीस म्हणून काम पाहत आहेत. यामुळे कारमधील गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. परिणामी पीसीआर कारमध्ये चालकासह २ किंवा ३ कर्मचारी असतात. कारमध्ये रायफलसारखे शस्त्र असते. दोन वर्षापूर्वी अपुऱ्या कर्मचाऱ्यांना पाहून एकतानगर जटवाडा येथे पीसीआर पोलिसांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात हे झाले नाही.