पोलिस कर्मचाऱ्याची लिपिकास अरेरावी; गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 6, 2016 23:58 IST2016-07-06T23:27:30+5:302016-07-06T23:58:03+5:30
बीड : विनावेतन रजा का केली ? या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याने अधीक्षक कार्यालयातील लिपिकासोबत मंगळवारी अरेरावी केली. याप्रकरणी लिपिकाने कर्मचाऱ्याविरूद्ध शहर ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिस कर्मचाऱ्याची लिपिकास अरेरावी; गुन्हा दाखल
बीड : विनावेतन रजा का केली ? या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याने अधीक्षक कार्यालयातील लिपिकासोबत मंगळवारी अरेरावी केली. याप्रकरणी लिपिकाने कर्मचाऱ्याविरूद्ध शहर ठाण्यात फिर्याद दिली.
विष्णू काकडे असे लिपिकाचे नाव असून, मधुकर पवार असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे हे अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक आहेत. विनावेतन रजा टाकल्यामुळे पवार यांचे नऊ हजार रूपये कपात झाले. त्यामुळे त्यांनी अरेरावीची भाषा करून कामात अडथळा केला, अशी काकडे यांची फिर्याद आहे. पवार हे मुख्यालयात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)