पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

By Admin | Updated: July 31, 2016 01:08 IST2016-07-31T00:59:51+5:302016-07-31T01:08:19+5:30

जालना : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह चार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड (ता. जि. जालना) पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश

Police officers cancels offense | पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द


पुणे : बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील पार्क्स एक्स्प्रेस सोसायटीच्या विनापरवाना मजल्याचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी दोन आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी हा आदेश दिला.
भावीन हर्षद शहा (वय ३४, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (वय ३५ रा. विवेकनगर, आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. नवी सांगवी), श्रीकांत किसन पवार (वय ४४, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ भावीन शहा हे कॉन्ट्रॅक्टर इन्चार्ज आहेत, तर संतोष चव्हाण आणि ज्ञानेश्वर चव्हाण हे साईड इन्चार्ज आहेत़ पवार या ठिकाणी नोकरीला आहेत़
अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी केली. संबंधित इमारतीची १३ व्या मजल्याची परवानगी घेण्यात आली होती का, याचा तपास करायचा आहे. कंपनीची रजिस्टर नोंदणी कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. बांधकामासंदर्भातील करार हस्तगत करायचे आहेत. आरोपींच्या घराची झडती घ्यायची आहे. पार्क्स एक्स्प्रेस बांधकामासंदर्भातील असलेल्या परवानगी आणि इतर कागदपत्रे पालिकेकडून प्राप्त करायची आहेत, अशी मागणी सरकारी वकील दातरंगे यांनी केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. सुधीर शहा आणि अ‍ॅड. नंदू फडके यांनी काम पाहिले. त्यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्यास विरोध केला.
>बालेवाडी येथील पार्क्स एक्स्प्रेस सोसायटीचा स्लॅब कोसळल्यामुळे शुक्रवारी नऊ कामगारांचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य न वापरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अटक करण्यात आलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Web Title: Police officers cancels offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.