पोलिसांची जीप झाडावर आदळली
By Admin | Updated: February 2, 2016 00:26 IST2016-02-01T23:55:04+5:302016-02-02T00:26:33+5:30
लोहारा : उस्मानाबाद येथील पोलिस मोटार परिवहन विभागाची जीप एका झाडावर जावून आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.

पोलिसांची जीप झाडावर आदळली
लोहारा : उस्मानाबाद येथील पोलिस मोटार परिवहन विभागाची जीप एका झाडावर जावून आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीपमधील एक अधिकारी व तीन कर्मचारी बालंबाल बचावले. लोहारा शहरालगत असलेल्य आमराईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद येथील पोलिस मोटार परिवहन विभागाची जीप (क्र. एमएच २५/ सी ६५७०) रविवारी उमरगा व तुळजापूर उपविभागात पेट्रोलिंगसाठी आली होती. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लोहारा मार्गे उस्मानाबादकडे जात असताना लोहारा-पाटोदा रस्त्यावर शहरालगत असलेल्या आमराईत गाडीतील बिनतारी संदेश संच चालकाच्या ब्रेकसमोरील पायाजवळ घसरले. वाहन चालवित असतानाच चालकाने हा संच उचलण्याचा प्रयत्न केल्याने चालकाचा वाहनावरून ताबा सुटून जीप आंब्याच्या झाडावर जावून आदळली. या अपघातात जीपच्या समोरील काच चक्काचूर होवून नुकसान झाले. सुदैवाने जीपमधील एक अधिकारी व तीन कर्मचारी या अपघातातून बालंबाल बचावले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झालेली नव्हती. (वार्ताहर)