शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पोलीस निरीक्षक निलंबित, डीवायएसपींची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:16 AM

नितीन कटारिया खून प्रकरणात गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया खून प्रकरणात गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित करण्यात आले, तर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.नितीन कटारिया यांनी सहा महिन्यांपूर्वीच आपल्या जिवाला धोका असल्याची लेखी तक्रार तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली होती.या संदर्भात कटारिया यांनी वारंवार विनंती करून पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. संशयित आपणास ५० लाखांची खंडणी मागत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारही त्यांनी तालुका ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील महिन्यात कटारिया यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. दरम्यान, मंगळवारीसकाळी न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणातील काही संशयितांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर घराकडे परतत असतानाच कटारिया यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, या संदर्भात बुधवारी राज्यमंत्री खोतकर यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे व पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची बैठक घेतली. अगोदरच खबरदारी घेतली असती तर हा प्रकार घडलाच नसता, अशी संतप्त भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केली होती. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांक्षी बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर या प्रकरणास जबाबदार असणाºया अधिकाºयांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. पोलीस अधीक्षक पोकळे यांनी गुुरुवारी रात्री तालुका जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निलंबित केले. रात्री उशिरा हे निलंबनाचे आदेश काढण्यात आले. तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड या अधिकाºयांची चौकशी करणार आहेत.शहरात आज मूकमोर्चाकटारिया व गगराणी प्रकरणाचा गुरुवारी जैन समाजाकडून गुरुवारी आयोजित सभेत निषेध करण्यात आला. आरोपींना अटक करावी व खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागणीसाठी शुक्रवारी गुरुगणेश भवन ते गांधी चमनपर्यंत जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नितीन कटारिया यांची सुपारी देऊन हत्या ?कटारिया यांची हत्या सुपारी देऊन केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे. कटारिया यांचा मारेकरी निष्पन्न झाला असून, तो जालना तालुक्यातील असल्याचे समजते. हनीफ बुºहाण घोचिवाले, अकबर बुºहाण घोचिवाले, सलीम बुºहाण घोचिवाले या तिघांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्यांची संख्या आता आठवर गेली असून, पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत.