पोलिस निरीक्षकावरच गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 16, 2014 01:29 IST2014-09-16T00:52:05+5:302014-09-16T01:29:59+5:30
हिंगोली : पोलिस कल्याण कार्यालयातील पोलिस निरीक्षक एस. बी. शिंदे यांच्याविरूद्ध सोमवारी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षकावरच गुन्हा दाखल
हिंगोली : पोलिस कल्याण कार्यालयातील पोलिस निरीक्षक एस. बी. शिंदे यांच्याविरूद्ध सोमवारी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहितेच्या कामासाठी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे.
मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालयातून पोनि एस. बी. शिंदे यांची हिंगोलीत बदली झाली होती. ५ जून २०१४ रोजी पोलिस कल्याण कार्यालयात ते रूजू झाले. प्रारंभीचे तीन आणि मध्यंतरीचे तीन दिवस मिळून आठवडाभरही त्यांनी काम केले नाही. १४ आॅगस्टपासून शिंदे सतत गैरहजर होते. नुकतीच आचारसंहिता लागल्यामुळे पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांनी कार्यालयात हजर होण्यास सांगितले. सोबत निवडणूक प्रक्रियेतील कामासाठी कर्तव्यावर येण्यासाठी आदेशही दिला; परंतु कर्तव्यावर हजर न होता शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे सोमवारी प्रभारी गृह पोलिस उपाधीक्षक शंकर सिटीकर यांनी शिंदे यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुंबई पोलिस अधिनियम १४५ नुसार शिंदे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा गुन्हा निलावाड यांच्याविरूद्ध दाखल झाला. लागोपाठोपाठ दोन धडाक्याच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांत भीती निर्माण झाली. पहिल्यांदाच हिंगोलीत लागोपाठ दोन अधिकाऱ्यांवर कारवाईच्या प्रकाराने जिल्हा चर्चेत आला.(प्रतिनिधी)