पोलीस निरीक्षक देसाई, एएसआय गाडेकर, गुप्तवार्ता अधिकारी धनवाई राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:08+5:302021-02-05T04:21:08+5:30
पोलीस निरीक्षक देसाई हे औरंगाबाद अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र तपासणी समिती येथे जून २०२० पासून कार्यरत आहेत. देसाई यांनी मुंबईत ...

पोलीस निरीक्षक देसाई, एएसआय गाडेकर, गुप्तवार्ता अधिकारी धनवाई राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी
पोलीस निरीक्षक देसाई हे औरंगाबाद अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र तपासणी समिती येथे जून २०२० पासून कार्यरत आहेत. देसाई यांनी मुंबईत कार्यरत असताना केतन पारेख याचा २०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. शिवाय त्यांनी अंमलीपदार्थविरोधी धडाकेबाज कारवाई करून कोट्यवधीचे अंमलीपदार्थ जप्त केले होते. त्यांना आतापर्यंत तीनशेहून अधिक रिवॉर्ड मिळाले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार रामदास गाडेकर यंदा पोलीस आयुक्तालयातील पदक मिळवणारे एकमेव कर्मचारी आहेत. गाडेकर यांना यापूर्वी पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले होते. राज्य गुप्तवार्ता विभागातील गुप्तवार्ता अधिकारी जयराम धनवई उंडणगावकर हे १९८९ साली पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात त्यांनी सेवा दिली. उल्लेखनीय सेवेसाठी २०१५ साली त्यांना पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले होते.
============( चौकट
गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सत्कार
पोलीस आयुक्तालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रपती पोलीसपदक प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.