गरीब गुणवंताला घेतले पोलीस निरीक्षकाने दत्तक
By Admin | Updated: August 4, 2015 00:42 IST2015-08-04T00:42:29+5:302015-08-04T00:42:29+5:30
बापू सोळुंके , औरंगाबाद हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात राबविलेल्या मुस्कान मोहिमेंतर्गत एका हॉटेलमध्ये काम करणारा गुणवंत विद्यार्थी पोलिसांच्या नजरेस पडला.

गरीब गुणवंताला घेतले पोलीस निरीक्षकाने दत्तक
बापू सोळुंके , औरंगाबाद
हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात राबविलेल्या मुस्कान मोहिमेंतर्गत एका हॉटेलमध्ये काम करणारा गुणवंत विद्यार्थी पोलिसांच्या नजरेस पडला. दहावी बोर्ड परीक्षेत ७६ टक्के गुण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अर्धवेळ नोकरी करणाऱ्या या गुणवान विद्यार्थ्याला हर्सूल ठाण्याचे निरीक्षक वसीम हाशमी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे त्यास हॉटेलमध्ये काम करण्याची गरज नाही. त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलल्याने खाकी वर्दीच्या आड दडलेल्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
देशभरात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. त्यानंतर हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुस्कान अभियान राबविले गेले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुस्कान पथके स्थापन करण्यात आली. हर्सूल ठाण्यातील सहायक फौजदार उत्तम गिरी, हेडकॉन्स्टेबल देवीदास राठोड