शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

५ मिनिटांत पोलीस मदत

By admin | Updated: June 2, 2015 00:35 IST

औरंगाबाद : तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी आदी गुन्हे रोखण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या

औरंगाबाद : तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी आदी गुन्हे रोखण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी नागरिकांना अवघ्या पाच मिनिटांच्या आत मदत मिळावी यासाठी १५२ प्रशिक्षित पोलिसांच्या ‘चार्ली’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वी आपापल्या ठाण्याच्या हद्दीत गस्त घालण्याची व गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी बीट मार्शल सांभाळत होते. आता बीट मार्शल ही संकल्पना मोडीत काढण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली ‘चार्ली’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकातील सदस्य हे २४ तास गस्तीवर राहून नागरिकांना सेवा देतील, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज येथे सांगितले. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप या कार्यक्रमात अमितेशकुमार आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील नांगरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमितेशकुमार म्हणाले की, रस्त्यांवरील गुन्हे रोखण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी मदत उपलब्ध व्हावी, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कामगिरी व्हावी, तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने ‘चार्ली’ पथक तयार करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या नियंत्रणात असणाऱ्या ‘बीट मार्शल’ची जागा आता चार्ली पथक घेईल. गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे. तरुण- तडफदार, कष्ट करण्याची तयारी तसेच सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या १५२ पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. हे पथक मोटारसायकलने शहरात गस्त घालणार आहे. काही महिला १ होर्डिंगच्या माध्यमातून शहर व गावांचे विद्रूपीकरण करण्याची प्रथाच सध्या सुरू आहे. होर्डिंगवरील दादा, भाऊ अशा लोकांची यादी करून त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्याचा उपक्रम पुण्यात राबविला होता. गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असणाऱ्या १३७ होर्डिंगबाजांना तेथे तडीपार करण्यात आले होते. ३ ग्रामीण भागात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सामाजिक प्रश्न असला तरी गावांमध्ये सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्री, जुगार अशा अवैध धंद्यांचा आत्महत्यांच्या प्रकरणांशी नकळत संबंध येतच असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गावांमधील अवैध धंद्यांवर चाप लावला जाईल, तसेच सावकारांविरुद्ध कारवाई अधिक गतिमान केली जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. २ अशाच प्रकारची मोहीम मराठवाडाभर राबविली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या होर्डिंगबाजांवर येथेही कारवाई केली जाईल, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.