कुजलेल्या अवस्थेत पोलिसाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: November 3, 2014 00:38 IST2014-11-03T00:21:34+5:302014-11-03T00:38:19+5:30
जालना : शहरातील वाल्मिकनगर भागात पोलिस नाईक संजय उत्तमराव पाटोळे यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला.

कुजलेल्या अवस्थेत पोलिसाचा मृतदेह आढळला
जालना : शहरातील वाल्मिकनगर भागात पोलिस नाईक संजय उत्तमराव पाटोळे यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी आणून शवविच्छेदन करण्यात आले. २ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता हा प्रकार लक्षात आला.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुलसिंह बुंदेले यांनी सांगितले, संजय पाटोळे हे कौटुंबिक तणावात होते. त्यामुळे पोलिस खात्यात कर्तव्यावर असतांनाही वारंवार गैरहजर राहत होते. एकाच वाड्यात राहणाऱ्या दोन भावांचा संवाद गत रविवारी पाणी भरतांना झाला होता. त्यानंतर आज २ नोव्हेंबर रोजी दुर्गंधी सुटल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. घराचे दरवाजे उघडे होते.
संजय पाटोळे यांची पत्नी गत सहा महिन्यांपासून औरंगाबाद येथे राहत आहे. ते एकमेकांपासून विभक्त असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे? शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. कुटूंबातील इतर व्यक्तींशी संजय पाटोळे यांच्याशी जास्त संबंध नव्हता, असे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचे बुंदेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)