पोलीस दलानेही तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:38 IST2017-08-12T00:38:26+5:302017-08-12T00:38:26+5:30

झपाट्याने बदलणाºया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलीस दलाने शास्त्रोक्त पद्धतीने तपासावर भर द्यावा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी येथे पोलीस अधिकाºयांना दिल्या

The police force should also be technically capable | पोलीस दलानेही तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे

पोलीस दलानेही तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : झपाट्याने बदलणाºया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलीस दलाने शास्त्रोक्त पद्धतीने तपासावर भर द्यावा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी येथे पोलीस अधिकाºयांना दिल्या. उत्कृष्ट काम करणाºया पोलीस कर्मचाºयांचा त्यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. बैठकीस पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह सर्व ठाणेप्रमुखांची उपस्थिती होती. गणेशोत्सव व बकरी ईद येत असल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात. अधिकाधिक गावे व प्रभागांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी अशा सूचना त्यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी विविध पथकांनी केलेल्या तपास कामांची माहिती दिली. डीजेमुक्त गणेशोत्सव व जालना पोलीस दलाच्या लोकाभिमुख उपक्रमांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पथकाचा गौरव
लुटमार करणाºया आंतरराज्य टोळ्यांचा गुन्हे शाखेने नुकतान पर्दाफाश केला. त्याबद्दल गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, कैलास कुरेवाड, भालचंद्र गिरी, विष्णू चव्हाण, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बघाटे, रंजित वैराळ, वैभव खोकले यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: The police force should also be technically capable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.