पोलिसास महिलांनी दिला चोप
By Admin | Updated: May 11, 2016 00:13 IST2016-05-11T00:10:28+5:302016-05-11T00:13:54+5:30
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे यात्रेत एका पोलीस कर्मचाऱ्यास महिलांनी बेदम मारहाण करुन चपलाने चोप दिला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

पोलिसास महिलांनी दिला चोप
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे यात्रेत एका पोलीस कर्मचाऱ्यास महिलांनी बेदम मारहाण करुन चपलाने चोप दिला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
रेवननाथ गंगावणे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तलवाडा येथे त्वरितादेवीची यात्रा सुरु आहे. ही यात्रा महिनाभर चालते. त्यामुळे मंदिराच्या पायथ्याला पोलीस कर्मचारी राहुटी ठोकून बंदोबस्त करतात. मंगळवारी राहुटीजवळच कंदुरीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी कंदुरीसाठी आलेल्या एकासोबत गंगावणेंची बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. महिलांनी गंगावणेंना घेरले. त्यांना लाथाबुक्क्या, चपलाने मारहाण करण्यात आली. यावेळी इतर कर्मचारीही तेथे होते; पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. गंगावणे यांनी कशीबशी आपली सुटका केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तलवाडा ठाण्यात कुठलीच नोंद नव्हती.
याबाबत निरीक्षक शिरीष हुंबे म्हणाले, काही लोक राहुटीत जेवण्यास बसले होते. त्यामुळे गंगावणे यांनी त्यांना ही जेवणाची जागा नाही, असे सांगितले. त्यानंतर महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली. गुन्हा नोंद करायचा की नाही, या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाहीत. (वार्ताहर)
व्हिडिओ व्हायरल; चर्चेला आला ऊत...!
पोलीस कर्मचारी गंगावणे व कंदुरीसाठी आलेल्या महिला- पुरुषांत झटापट झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला. त्यात झटापट दिसत असून गंगावणेंनी प्रत्युत्तरादाखल दगड उचलल्याचेही पहावयास मिळत आहे. व्हिडिओ व्हायरलमुळे खळबळ उडाली आहे.