शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

पोलिसांनीच केले पोलिसांचे स्टिंग, औरंगाबादमधील घटना, वाळू वाहतूकदारांकडून हप्तावसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:58 IST

रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करणा-या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली करणारे वाहतूक पोलीस कोण, हे पाहण्यासाठी पोलिसांनीच स्टिंग आॅपरेशन केले आणि ती छायाचित्रे वरिष्ठांना सादर केली.

औरंगाबाद : रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करणा-या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली करणारे वाहतूक पोलीस कोण, हे पाहण्यासाठी पोलिसांनीच स्टिंग आॅपरेशन केले आणि ती छायाचित्रे वरिष्ठांना सादर केली. सहायक पोलीस आयुक्तांनी या तक्रारींची चौकशी करून नुकताच अहवाल सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.वाळूज एमआयडीसी परिसरात वाळूची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांना पोलीस अडवितात आणि त्यांच्याकडून वसुली करतात, अशी तक्रार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांना प्राप्त झाली होती. याबाबत त्यांनी चौकशी केली असता रात्री ९ वाजेनंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी समाप्त होत असल्याने रात्रीच्या वेळी वाळू वाहतुकदारांकडून हप्ता वसूल करणारे ते नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.परिणामी, वाहनचालकाची अडवणूक करणारे नेमके कोण आहेत, याबाबतची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनीच या प्रकरणाचे स्टिंग आॅपरेशन केले.पोलीस आयुक्तांना अहवाल सादरया स्टिंग आॅपरेशनमध्ये एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला वाहनचालक वाळूची वाहतूक करणाºया एका ट्रॅक्टरचालकास अडवून त्याच्याशी बोलत असल्याची छायाचित्रे एसीपी शेवगण यांना प्राप्त झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी छावणी विभागाचे सहायक आयुक्त डी. एन. मुंढे यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंढे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंढे यांनी ८ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

 

टॅग्स :Policeपोलिस