शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

बोगस पदवी प्रकरणात पोलिसांना, विद्यापीठ प्रशासनाकडून मिळेना तपासात सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:45 IST

विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची, पदव्यांची पडताळणी वेगात होत नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बनावट पदवीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेतल्यामुळे खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव, सहसचिवाविरोधात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यात आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच वेळी विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची, पदव्यांची पडताळणी वेगात होत नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच मुख्य आरोपीला जामीन मंजूर झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने बोगस पदवी प्रकरणात कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान, सहसचिव मकसूद खान यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविला. यानंतर अस्मा खानचा नवरा तथा संस्थेचा अध्यक्ष मजहर खान याला आरोपी करण्यात आले. त्याच वेळी कनिष्ठ महाविद्यालयात बनावट पदवीच्या आधारे मराठी व मानसशास्त्र विषयांत नोकरी मिळविणारा मोहंमद हफिज उररहमान मोहंमद मोईनोद्दीन याला अटक केली. या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे तत्कालीन प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांना अटक केली. अटक आरोपींना न्यायालयाकडून पीसीआर मंजूर करण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयातील काहींनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पदव्यांची तपासणी संबंधित विद्यापीठ, संस्थांकडून लवकरात लवकर करून घेण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्यात विद्यापीठाकडून पोलिसांना सहकार्य मिळण्यात दिरंगाई होत आहे. त्याचा फायदा प्रकरणातील आरोपी मकसूद खान याला झाला आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच विद्यापीठाने तक्रार देण्यासाठी उपकुलसचिवांना प्राधिकृत केल्याचे पत्रही अद्यापपर्यंत पोलिसांना दिलेले नसल्याची माहिती आहे.

प्रमुख आरोपींचे चौकशीत असहकार्यपोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी मजहर खान याला तीन वेळा पोलिस कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत त्याने पोलिसांना पदव्यांची छपाई कोठे केली? कितीजणांना बनावट पदव्या दिल्या? या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे, याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. त्याशिवाय प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे हेसुद्धा पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे समजते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCrime Newsगुन्हेगारी