तोतया पोलिसांनी पळविले ४५ हजार रूपये
By Admin | Updated: September 2, 2014 01:50 IST2014-09-02T00:28:23+5:302014-09-02T01:50:19+5:30
जालना : सिंधीबाजारहून देऊळगावराजा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुपाली बिअर बारजवळ दोघांनी आपण पोलिस असल्याचे सांगून खरेदीसाठी आलेल्या ज्ञानेश्वर सखाराम ताणपट

तोतया पोलिसांनी पळविले ४५ हजार रूपये
जालना : सिंधीबाजारहून देऊळगावराजा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुपाली बिअर बारजवळ दोघांनी आपण पोलिस असल्याचे सांगून खरेदीसाठी आलेल्या ज्ञानेश्वर सखाराम ताणपट याच्याकडील ४५ हजार रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार मंगळवार १ सप्टेंबर रोजी दुपारी २.१५ वाजता घडला.
पैठण येथील व्यापारी ज्ञानेश्वर ताणपट हे मित्रासह जालना येथे स्टेशनरी सामान खरेदी करण्यासाठी आले होते. बसस्थानकावर उतरून ते पायी सिंधीबाजारमार्गे दवाबाजारकडे जात होते. या दरम्यान असलेल्या रूपाली बिअर बारजवळ दोघे जण मोटारसायकलवरून आले. आपण पोलिस असल्याचे सांगून ताणपट व त्यांच्या सहकार्याची झडती घ्यावयाची असल्याचे सांगितले. ताणपट यांच्या पिशवीत असलेले ४५ हजार रूपयांची रोकड हातात घेऊन पुन्हा पिशवीत ठेवत असल्याचे भासवून ही रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार प्रेमानंद लालझरे यांनी दिली. अधिक तपास जमादार सोळुंके करीत आहेत.
दोघे तडीपार
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील लाल्या उर्फ शिवराज वाहुळे व अविनाश कैलास उघडे यांना जालना व जवळच्या जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील अनेक आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या दोघांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे जमादार ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली. (प्रतिनिधी)