शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पोलीस विभागातही लाचखोरीची स्पर्धा !

By admin | Updated: March 19, 2015 00:16 IST

उस्मानाबाद : मागील दीड-दोन वर्षापासून जिल्ह्यात चोरटे, दरोडेखोरांनी एकच धुमाकूळ घातला आहे़ अनेक चोऱ्यांचा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहे़

उस्मानाबाद : मागील दीड-दोन वर्षापासून जिल्ह्यात चोरटे, दरोडेखोरांनी एकच धुमाकूळ घातला आहे़ अनेक चोऱ्यांचा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहे़ या चोऱ्यांचा तपास करण्याऐवजी पोलीस दलातील काही अधिकारी-कर्मचारी लाच मागण्यातच गर्क असल्याचे ‘एसीबी’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे़ कारवाईची आकडेवारी पाहता जणू लाच मागण्याची स्पर्धा पोलीस विभागात लागली की काय? असा प्रश्न समोर येतो़ विशेष म्हणजे कारवाईपासून दूर असलेल्या सरपंचांचीही लाचखोरी ‘एसीबी’ने चव्हाट्यावर आणली असून, अनेक दलालांनाही जेरबंद केले आहे़गतवर्षी १६ मार्च रोजी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने सापळा रचून जेरबंद केले़ प्रभावती वारे व छाया रोंगे या दोघींना जेरबंद करण्यात आले होते़ त्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख व पोलीस नाईक भिमसेन भारती यांना एक हजाराची लाच घेताना जेरबंद करण्यात आले़ त्यानंतर ढोकी पोलीस ठाण्याचे पोना संजीव शिंदे यांना ६०० रूपयांची लाच घेताना तर कारागृहातील रक्षक वैजिनाथ मुंढे यांना २०० रूपयांची लाच घेताना जेरबंद करण्यात आले़ कळंब पोलीस ठाण्याचे हवालदार दिपक गोलेकर यांना तीन हजाराची लाच घेताना जेरबंद करण्यात आले़ तर नळदुर्ग पोलीस ठाण्यात दुसरी कारवाई करून पोहेकॉ गोविंद पवार व दाऊद कोतवाल या दोघांना दोन हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली़ त्यानंतर परंडा पोलीस ठाण्यातील सपोफौ समियोरहेमान काझी यांना अटक करण्यात आली होती़ मात्र, काझी यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याने पोलीस दलातच नव्हे तर अवघ्या जिल्ह्यात खळबळ उडाली़ या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले होते़ परंडा पोलीस ठाण्याचेच सपोनि गुरूनाथ चव्हाण व हॉटेल चालक शांतलिंग विटकर यांनाही पोलिसांनी जेरबंद केले़ तर मुरूम पोलीस ठाण्यातील हवालदार प्रविण गायकवाड यांनाही अटक करण्यात आली होती़ लोहारा तालुक्यातील चिंचोली काटे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र जेटीथोर, इजोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया चव्हाण व रोजगार सेवक नवनाथ कुंभारकर या दोघाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे़ तसेच सरपंच, ग्रामसेवकांना सांगून काम करून देतो म्हणून २० हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारणारा खासगी इसम समद खासीम बागवान, वीजजोडणीचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करून देतो म्हणून ५००० रूपये घेणारे बिभिषण कुंभार, नायब तहसीलदारांना सांगून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून देतो म्हणून पैसे घेणाऱ्या संतोष वाडकर या खाजगी इसमाविरूध्दही कारवाई करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार गोपीनाथ चव्हाण, पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन विभागातील वरिष्ठ लिपिक संदीप चव्हाण, महिला व बालविकासचे संरक्षण अधिकारी विनोद भोसले, तुळजापूर पालिकेतील सहशिक्षक तथा लिपीक पांडुरंग घुटे, उस्मानाबाद कृउबातील प्रभारी सचिव प्रविण देवरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील वित्त विभागातील जिल्हा लेखा परिवक्षेक प्रशांत ढेकणे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे़एसीबीने २२ जुलै २०१४ रोजी पोलीस मुख्यालयातच सापळा यशस्वी करून खरी खळबळ उडवून दिली़ प्रमुख लिपीक झकिया काझी व वरिष्ठ लिपिक संजय काळे या दोघांना तक्रारदाराच्या जमीन मोजणीच्या कामासाठी पोलीस संरक्षण पुरविण्याचा आदेश संबंधित पोलीस ठाण्याला देण्यासाठी २००० रूपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्विकारली होती़मायक्रो चॉकी योजना व डोअर टू डोअर निर्जंतुकीकरण योजना मंजूर करून त्याचे अनुदान काढून देण्यासाठी २५००० रूपये लाच घेणाऱ्या वस्त्रोद्योग खात्याच्या जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रियंका गणाचार्य यांच्याविरूध्द ७ जानेवारी २०१५ रोजी कारवाई करण्यात आली आहे़ यापूर्वी या कार्यालयातील एका अधिकाऱ्याविरूध्दही कारवाई करण्यात आली होती़