७१ हजारांचा ऐवज चोरणाऱ्याला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:04 IST2021-06-22T04:04:07+5:302021-06-22T04:04:07+5:30

------- मुलीवर अत्याचार; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर औरंगाबाद : पाण्याची भरलेली कॅन आणल्यास १० रुपये देतो, असे आमिष दाखवून ...

Police custody for thief who stole Rs 71,000 | ७१ हजारांचा ऐवज चोरणाऱ्याला पोलीस कोठडी

७१ हजारांचा ऐवज चोरणाऱ्याला पोलीस कोठडी

-------

मुलीवर अत्याचार; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद : पाण्याची भरलेली कॅन आणल्यास १० रुपये देतो, असे आमिष दाखवून १९ वर्षीय भोळसर मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी भगवान किसन बलांडे याचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी दुसऱ्यांदा नामंजूर केला. सरकारतर्फे सहाय्यक लोकअभियोक्‍ता मधुकर आहेर यांनी काम पाहिले.

---

विवाहितेला मारहाण; सासरचे पाच जण कारागृहात

औरंगाबाद : तलाक घेण्यासाठी घरात घुसून विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्‍याची धमकी देणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांची न्‍यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने सोमवारी दिले.

इम्रान शेख निजाम शेख (२५), नसीमाबी शेख निजाम शेख (५५), अक्रम शेख निजाम शेख (४२), परविन शेख कदीर शेख (३७) आणि क‍दीर शेख अमीर शेख (सर्व रा. रहमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

---

Web Title: Police custody for thief who stole Rs 71,000