पोलिसांनी केला नय्युमचा दफनविधी

By Admin | Updated: November 13, 2016 00:43 IST2016-11-13T00:45:35+5:302016-11-13T00:43:36+5:30

निलंगा : निलंगा शहरामध्ये गेल्या १५ वर्षांपासून राहत असलेल्या नय्युम शेख यांचे नुकतेच निधन झाले

Police bury the funeral of Nayyum | पोलिसांनी केला नय्युमचा दफनविधी

पोलिसांनी केला नय्युमचा दफनविधी

निलंगा : निलंगा शहरामध्ये गेल्या १५ वर्षांपासून राहत असलेल्या नय्युम शेख यांचे नुकतेच निधन झाले असून, ते कोणत्या गावचे, कोठून आले, त्यांचे नातेवाईक कोण याचा थांगपत्ता पोलिसांनाही लागला नाही़ परंतु पोलिसांनी व शहरातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा दफनविधी करून माणुसकी घडविण्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला़
नय्युम महम्मद शेख (६०) हे गेल्या १५ वर्षापूर्वी निलंगा शहरात दाखल झाले़ त्यांचा शिलाई मशिनचा व्यवसाय त्यातूनच मिळालेल्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे १५ वर्ष व्यवसायात राहूनही ते कुठले याचा पत्ता मात्र टेलरिंग व्यवसायातील साथीदारांनाही लागला नाही़ मात्र त्यांचे निधन बुधवारी झाल्यामुळे हा प्रकार समोर आला असून, पोलीस व व्यापाऱ्यांनी त्याचा दफनविधी केला़ (वार्ताहर)

Web Title: Police bury the funeral of Nayyum