पोलीस पाटलाने केला युवतीचा विनयभंग
By Admin | Updated: May 20, 2017 00:42 IST2017-05-20T00:41:29+5:302017-05-20T00:42:41+5:30
वाढवणा : घरात एकटीच असलेल्या एका युवतीचा गावातील पोलीस पाटलानेच विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी खेर्डा (ता़ उदगीर) येथे घडली

पोलीस पाटलाने केला युवतीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढवणा : घरात एकटीच असलेल्या एका युवतीचा गावातील पोलीस पाटलानेच विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी खेर्डा (ता़ उदगीर) येथे घडली आहे़ याप्रकरणी वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद आहे़
खेर्डा येथील एका घरातील मंडळी काही कामानिमित्ताने शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडली होती़ दरम्यान, कुटुंबात एकच युवती होती़ गावातील पोलीस पाटील व्यंकटराव गंगाराम पाटील हा काही काम असल्याचा बहाणा करुन तिथे पोहोचला़ घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचा विनयभंग केला़ दरम्यान, काही वेळानंतर घरातील मंडळी असल्याने तिने घडलेला प्रकार सांगितला़ सदरील युवतीच्या फिर्यादीवरुन वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़