पोलिसांनी उडवली मटकाबहाद्दरांची झोप
By Admin | Updated: April 8, 2017 21:37 IST2017-04-08T21:34:10+5:302017-04-08T21:37:00+5:30
बीड : शहरातील पेठ बीड भागात शुक्रवारी पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून मटकाबहाद्दरांची अक्षरश: झोप उडवली.

पोलिसांनी उडवली मटकाबहाद्दरांची झोप
बीड : शहरातील पेठ बीड भागात शुक्रवारी पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून मटकाबहाद्दरांची अक्षरश: झोप उडवली.
जुना मोंढा भागात श्रीकिसन तांबारे याला मटका घेताना पकडले. २११० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इस्लामपूर भागात सय्यद शहानवाज खलील याला पकडून ३७३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तेलगाव नाका येथे शेख अफान शेख रहीम हा गळाला लागला. त्याच्याकडे २१६० रूपये आढळले. गांधीनगरात सय्यद इस्माईल जाफर, बार्शी नाका येथे अब्दुल मतीन अब्दुल कादर या दोघांना पकडले. त्यांच्याकडून अनुक्रमे ६०४०, ५०४० रूपये जप्त करण्यात आले. इमामपूर रस्त्यावर शेख हमीद शेख चाँद याला पकडून ५०४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. साळ गल्लीत शैलेश उत्रेश्वर बिडवे याला पकडून ३६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)