शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात रात्री पोलिसांची नाकाबंदी, उल्कानगरीत मात्र भरदिवसा घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:55 IST

उल्कानगरीतील उच्चभ्रू वसाहतीत भरदिवसा फोडला फ्लॅट, १५ तोळे सोने व रोख लंपास

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून रात्री पोलिसांकडून कसून गुन्हेगारांची तपासणी, नाकाबंदी केली जात आहे. चोरांनी मात्र दिवसाच शहरातील वावर वाढवून घरांना लक्ष्य करणे सुरू केल आहे. सोमवारी उल्कानगरी, विष्णुनगर मध्ये २ घरे तर जाधववाडीत एक टायरचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला.

धनंजय जोशी हे कुटुंबासह सध्या रामचंद्रनगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या मूळ घराचे नूतनीकरण सुरू असल्याने ते काही महिन्यांपूर्वी या परिसरातील फ्लॅटमध्ये राहण्यास आले आहेत. कार्यालयीन कामानिमित्त धनंजय बाहेरगावी गेले होते. तर त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांची पत्नी दुपारी १२ वाजता त्यांच्या कार्यालयात गेली होती. तर, धनंजय यांची आई डबा देण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. याचदरम्यान चोरांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून फ्लॅटचे कुलूप तोडत प्रवेश केला.

दुपारीच कार्यभाग उरकून पसारघाईत जाताना जोशी यांच्या कुटुंबीयांकडून लॅचलॉक व लोखंडी ग्रील दरवाजा लावणे राहून गेले. ही बाब चोरांच्या पथ्यावर पडली. चोरांनी मुख्य कुलूप तोडून घरात प्रवेश करत जवळपास १५ ते १८ तोळे सोने, रोख रक्कम चोरून नेली. जाताना अपार्टमेंटच्या दुसऱ्या गेटने बाहेर पडून ते मागील सोसायटीतून पसार झाले. पोलिसांच्या श्वानाने अर्ध्या रस्त्यापर्यंत त्यांचा माग काढला. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक अशाेक शरमाळे, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे, चोरांनी जाताना कुलूप सोबत नेले.

विष्णुनगरमध्ये चोरांचा वावरदुसरी चोरीची घटना विष्णुनगमधील शिवाजी वाकळे (३७) यांच्या घरी उघडकीस आली. २ जून रोजी वाकळे लग्नानिमित्त उदगिरला गेले होते. याच दरम्यान चाेरांनी त्यांचे घर फोडून जवळपास एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, १८ तोळे चांदिचे दागिने, १५ हजार रोख रक्कम, एक मोबाइल चोरून नेला. सोमवारी दोन्ही घटनांत जवाहरनगर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

दुकान फोडून २ लाख रोख चोरीलाजाधववाडीत राहणाऱ्या कृष्णा पवार यांचे शुभश्री नावाने टायरचे दुकान आहे. शनिवारी रात्रीतून चोरांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील २ लाख ३ हजार ८०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. हर्सूल पोलिस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी