पोलीस हल्ला प्रकरण; आणखी एक गजाआड
By Admin | Updated: March 28, 2016 00:20 IST2016-03-27T23:47:51+5:302016-03-28T00:20:05+5:30
बीड : पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवारी शहरातील बार्शी नाका भागात पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

पोलीस हल्ला प्रकरण; आणखी एक गजाआड
बीड : पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवारी शहरातील बार्शी नाका भागात पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
२७ फेबु्रवारी रोजी अहमदनगर रस्त्यावरील एका हॉटेलात ग्रामीण ठाण्याचे कर्मचारी कैलास ठोंबरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या ठोंबरेंना आपला एक डोळा गमवावा लागला आहे. ११ फेबु्रवारी रोजी चार आरोपी पकडले होते. त्यानंतर मुख्य आरोपी गणेश जाधव याने आत्मसमर्पण केले. हे पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
रविवारी बाजीराव रामचंद्र गायकवाड (रा. पूनम गल्ली, पेठ बीड) याला जेरबंद करण्यात दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले. तो महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. फरार असताना सोलापूर, बार्शी, सातारा या भागात तो फिरत होता. बार्शी नाका भागात त्याची सासरवाडी आहे. तेथे त्याने आश्रय घेतला होता. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रा.काँ. नगरसेवक सय्यद मुस्तफा हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. (प्रतिनिधी)