महिलेच्या वेषातील सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:10 IST2017-09-02T00:10:01+5:302017-09-02T00:10:01+5:30

रेल्वेस्थानकावर महिलेच्या वेषातील एका सोनसाखळी चोरट्याला रेल्वे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून हा चोरटा पळून जात होता़

Police arrested the son-in-law's thieves in a woman's garment | महिलेच्या वेषातील सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी पकडले

महिलेच्या वेषातील सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: रेल्वेस्थानकावर महिलेच्या वेषातील एका सोनसाखळी चोरट्याला रेल्वे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून हा चोरटा पळून जात होता़
गुरुवारी दुपारी फलाट क्रमांक ४ वर काचीगुडा ते नरखेड जाणाºया इंटरसिटी एक्स्प्रेसची वाट पाहत धर्माबादच्या फुलेनगर येथील एक महिला उभी होती़ फलाटावर प्रवाशांची बरीच गर्दी होती़ गर्दीचा फायदा घेत महिलेच्या वेषातील आरोपी लक्ष्मण खंडोबा हातुर्डे (रा़महाकाली) मंदिर याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रे ओढून पळ काढला़ महिलेच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडोओरड केली़
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक रवींद्रसिंघ राजावत हे कर्मचाºयांसह फलाटावर गस्त घालत होते़ त्यांना एक जण फलाट क्रमांक ४ वरुन गोकुळनगरच्या दिशेन पळताना दिसला व मागे लोक त्याच्या दिशेने हातवारे करीत आरडाओरड करीत होते़ राजावत यांना त्या पळणाºया महिलेच्या वेषातील पुरुषाबाबत संशय आला़ त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली़ काही वेळातच पोलिसांनी त्याला पकडले़ त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त केले़ यावेळी ती महिलाही तेथे आली़ त्यांनीही चोरट्याला ओळखले़ रेल्वे पोलिसांनी चोरट्यास राज्य पोलिसांच्या ताब्यात दिले़

Web Title: Police arrested the son-in-law's thieves in a woman's garment