पाथरीत १७ जुगाºयांना पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:24 IST2017-09-25T00:24:25+5:302017-09-25T00:24:25+5:30
पोलिसांच्या विशेष पथकाने २३ सप्टेंबर रोजी पाथरी शहरातील एकतानगरात धाड टाकून १७ जुगाºयांना अटक केली. या कारवाईत ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाथरीत १७ जुगाºयांना पोलिसांनी पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलिसांच्या विशेष पथकाने २३ सप्टेंबर रोजी पाथरी शहरातील एकतानगरात धाड टाकून १७ जुगाºयांना अटक केली. या कारवाईत ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गनी बागवान यांच्या निवासस्थानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जुगाºयांना ताब्यात घेतले असून, १९ हजार ३२० रुपयांची रोख रक्कम, तीन मोटारसायकल असा ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उस्मान शेख, उपनिरीक्षक नागनाथ सनगले, किरण भूमकर, श्रीकांत लांडगे, तिप्पलवाड, कांबळे, टेकाळे, स्वामी यांनी ही कारवाई केली.