शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

दुचाकीस्वार महिलेला चिरडणारी बस व चालकही पोलिसांना सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:46 IST

एका महिलेचा बळी घेणारे हे वाहन खाजगी ट्रान्स्पोर्ट कंपनीचे असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे जालना रोडवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरूअपघाताला कारणीभूत ठरलेले केबल अखेर काढले

औरंगाबाद : रस्त्यात पडलेले केबल अडकल्याने खाली पडलेल्या दुचाकीस्वार महिलेला चिरडल्यानंतर घटनास्थळावरून बससह पसार झालेला चालक घटनेच्या ३६ तासांनंतरही पोलिसांना सापडला नाही. एका महिलेचा बळी घेणारे हे वाहन खाजगी ट्रान्स्पोर्ट कंपनीचे असल्याची चर्चा आहे. मात्र, या बसचा क्रमांक एकाही प्रत्यक्षदर्शीने पाहिला नाही. यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांना बसपर्यंत पोहोचता आले नाही. 

दुचाकीने व्यायामशाळेत जाणाऱ्या ललिता शंकर ढगे (३९,रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा) यांना शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास भरधाव बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याविषयी मृताचा पुतण्या कार्तिक पुंडलिक ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ललिता यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावी नेला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि कर्मचारी करीत आहेत. घटना घडल्यापासून ते रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पथकाने जालना रोडवरील विविध इमारतींवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हस्तगत केले. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करीत आहेत.

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शींकडे संबंधित बसबाबत विचारपूस करीत आहेत. मात्र, अद्याप बसचा क्रमांक सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शींसमोर आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार ललिता यांना उडविणारी बस पांढऱ्या रंगाची आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून सकाळी ८ ते ९ या कालावधीत जालना रोडने जाणाऱ्या बसचे क्रमांक मिळविले आहेत. आता प्रत्येक बसच्या चालकाची चौकशी केली जात असल्याची माहिती उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली.

अपघाताला कारणीभूत ठरलेले केबल अखेर काढलेअपघाताला कारणीभूत ठरलेल्या पथदिव्याच्या खांबावरून रस्त्यावर पडलेले इलेक्ट्रिक केबल, तार आणि मांजा रविवारी सकाळी घटनास्थळावरून हटविण्यात आला. हे केबल वायर पोलिसांनी जप्त करण्यापूर्वीच महापालिकेने काढून नेल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी त्या केबल वायरची छायाचित्रे काढली होती.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद