शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफर्स्टसाठी पोलीस अलर्ट; शहरात तब्बल तीन हजार पोलीस केले जाणार तैनात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:51 IST

कोरेगाव-भीमा दंगलीची वर्षपूर्ती अन् थर्टीफर्स्टसाठी शहर पोलीस अलर्ट

ठळक मुद्दे ७२ ठिकाणी फिक्स पॉइट मद्यपी वाहनचालकांवर होणार कारवाई

औरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद औरंगाबादेत गतवर्षी नववर्षदिनीच उमटले होते. या दंगलीची वर्षपूर्ती आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले आहेत. नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि शांततेत व्हावे, यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी शहरात तब्बल  तीन हजार पोलीस तैनात केले जाणार आहे. शिवाय संवेदन आणि अतिसेवंदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ७२ ठिकाणी फिक्स पॉइट लावण्यात आले.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की,मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी  शहरवासियांनी तयारी सुरू केली आहे. १ जानेवारी रोजी सर्वत्र शौर्य दिनही साजरा होणार आहे. नागरिकांच्या आनंदात काही विघ्न येऊ नये म्हणून सर्व पोलीस दलही सज्ज झाले आहेत.  ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रत्येक पॉर्इंटवर एक फौजदार आणि पाच कर्मचारी नेमण्यात आले. तर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विविध ६ ठिकाणी वाहनांची नाकांबदी केली जाणार आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून  वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मद्यपी वाहनचालकांवर होणार कारवाईनव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अति उत्साही लोक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. दारू पिऊन वाहन चालविणारा स्वत:सोबत अन्य वाहनचालकांचे प्राण धोक्यात घालतो, यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथके स्थापन क रण्यात आल्याचे डॉ. कोडे म्हणाले.

पहाटे पाचपर्यंत बार खुलेदारू पिऊन थर्टीफर्स्ट साजर करणाऱ्यांसाठी पहाटे पाचपर्यंत बीअर बार उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दारू दुकानेही रात्री १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.  

बेकायदा दारूविक्रीवर लक्षबेकायदा दारूविक्रे त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेसह विविध ठाण्यांची स्वतंत्र दोन पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये १ अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सहा ठिकाणी नाकाबंदीशहराच्या शांततेला बाधा पोहोचविण्याच्या उद्देशाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रस्त्यावरील नाका, दौलताबाद टी-पॉइंट आणि वाळूज नाका आदी ठिकाणी तपासणी नाके(चेक पोस्ट) लावण्यात येणार आहेत. तेथे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाईल. 

टॅग्स :PoliceपोलिसNew Year 2019नववर्ष 2019Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार