पोलीस प्रशासन दक्ष आहे; नागरिकांनीही सजग रहावे
By Admin | Updated: June 25, 2017 23:39 IST2017-06-25T23:28:58+5:302017-06-25T23:39:44+5:30
वसमत : ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सजग राहावे.आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.

पोलीस प्रशासन दक्ष आहे; नागरिकांनीही सजग रहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सजग राहावे. त्याचप्रमाणे बेवारस वस्तू किंवा अनोळखी व्यक्तीसंदर्भात माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. वसमत येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे शनिवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक अरविंंद चावरिया, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद, तहसीलदार उमाकांत पारधी, उपनगराध्यक्ष खैसर अहेमद, मौलाना बाशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल आदींची उपस्थिती होती.
यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व सूचना मांडल्या. वसमत शहरात सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत तहसीलदार पारधी व पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक अनेक सदस्यांनी केले.
पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी अवैध धंदे व अवैधधद्यांना पडद्याआडून पाठबळ देणाऱ्यांवर सरळ केल्याच्या भावनाही अनेकांनी या बैठकीत बोलून दाखवल्या.
पोलीस अधीक्षकांनी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असल्याचे सांगून नागरिकांनीही पोलिसांच्या मदतीला राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बैठकीस शांतता कमिटीच्या सदस्यांसह नागरिक, पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.