निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज

By Admin | Updated: October 29, 2015 00:16 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:16:36+5:30

जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रानी दिली.

Police administration ready for elections | निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज

निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज


जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रानी दिली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका ह्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर घेण्याचे निवडणुक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, मतदारांनी निर्भयपणे मतदाना करावे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्यावतीने काळजी घेण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील घनसावंगी, मंठा, बदनापूर व जाफराबाद या चार ठिकाणी नगर पंचायतीच्या पहिल्यांदाच निवडणुका पारपडत आहे.
तसेच जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
त्यात १०० पोलिस अधीकारी, १४०० कर्मचारी, १२१० होमगार्ड, राज्य राखीव पोलिस बलाच्या ३ कंपन्या असा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
(वार्ताहर)

Web Title: Police administration ready for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.