मदरशामधील अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: February 16, 2015 00:51 IST2015-02-16T00:49:19+5:302015-02-16T00:51:45+5:30
उस्मानाबाद : शहरातील मिल्ली कॉलनी भागातील अहिया उलूम या मदरशातील ११ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

मदरशामधील अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा
मदरशामधील अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा
उस्मानाबाद : शहरातील मिल्ली कॉलनी भागातील अहिया उलूम या मदरशातील ११ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना रविवारी पहाटे घडली़ दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले़
शहरातील मिल्ली कॉलनी भागात अहिया उलूम नावाचा मदरसा असून, या मदरशामध्ये जवळपास १५० विद्यार्थी शिक्षण घेतात़ यातील काही विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री जेवणामध्ये वांग्याची भाजी खाल्ली होती़ रविवारी पहाटेपासून यातील ११ विद्यार्थ्यांना उलटी, संडास, पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता़ त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़
मदरशातील इनायत बरकत शेख (वय-११), अकबर करीम सय्यद (वय-१०), मुस्तजान अन्वर सय्यद (वय-०८), मिस्ताद महैबुब शेख (वय-१०), नुमान आरमान शेख (वय-११), अहमद इस्माईल शेख (वय-०९), मोहंमद आजीद नदाफ (वय-११), साहील सत्तार शेख (वय-११), अबराज सत्तार पठाण (वय-१३), अजहर आरपल्लाह फुलारी (वय-१६), जोशान जमीर शेख (वय-१५) या अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ विद्यार्थ्यांची ्रप्रकृती स्थिर असून, त्यांना कसलाही धोका नसल्याचे रूग्णालय सुत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)