शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

मेसच्या मिष्टान्नातून १५ मुलींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:12 AM

मेसमधील जेवणामुळे या वसतिगृहातील १५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मेसमध्ये गोड जेवणाचा बेत डॉ. इं. भा. पा.महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी कटू अनुभव ठरला. मेसमधील जेवणामुळे या वसतिगृहातील १५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी घडली. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी निराला बाजार येथील वसतिगृहात पुरी-भाजी व गुलाबजामूनचे जेवण होते. विद्यार्थिनींनी दुपारी जेवण केल्यानंतर सायंकाळी काही मुलींना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. वसतिगृह प्रशासनाने मुलींना समर्थनगर येथील खाजगी रुग्णालयात नेले. परंतु सुटी असल्यामुळे त्या दवाखान्याचा बाह्यरुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे दुसºया खाजगी इस्पितळात ३० विद्यार्थिनींना नेण्यात आले.डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यापैकी १५ विद्यार्थिनींना औषधी देऊन तात्काळ सुटी दिली. १५ विद्यार्थिनींना मात्र दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉ. धनंजय खटावकर यांनी सांगितले की, मुलींना उलटी, जुलाब, डोकेदुखी, मळमळ असा त्रास होता. अन्नातून विषबाधा झाली असल्यामुळे या प्रकरणाची माहिती आम्ही पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्री १०.३० वाजता येऊन मुलींना भेट दिली. महाविद्यालयानेदेखील पालकांना झालेल्या प्रकाराची माहिती कळविली. रात्रभर उपचार केल्यानंतर बुधवारी ८ मुलींना सुटी देण्यात आली. इतर ७ मुली अद्यापही दवाखान्यात उपचार घेत आहेत.