विष पाजून युवकाला फेकले रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:27 IST2017-11-16T23:27:23+5:302017-11-16T23:27:28+5:30

उसने पैसे परत मागून एका २८ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकले.

 The poison of youth is on the rail track | विष पाजून युवकाला फेकले रेल्वे रुळावर

विष पाजून युवकाला फेकले रेल्वे रुळावर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उसने पैसे परत मागून एका २८ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकले. रुळावरून पाच मिनिटांच्या अंतराने दोन रेल्वे धडधडत गेल्या तत्पूर्वीच दक्ष नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेने मृत्यूच्या दाढेतून युवकाचे प्राण वाचविल्याची थरारक घटना बुधवारी रात्री घडली.
रवींद्र नाना दांडगे (२८, रा. चेतनानगर, हर्सूल) असे त्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर घाटीच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू आहेत. भोकरदन येथील काकोबा तळणीचा गोपाल प्रकाश भुतेकर याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळून फोन करून रवींद्रला बोलवून घेतले. त्यावेळी भुतेकर याने तू माझे पैसे कधी देणार, यावरून शाब्दिक वाद सुरू झाला. रवींद्रने त्याला जानेवारीत पैसे देतो, असे सांगितले; परंतु त्याने पोटात, पाठीवर लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करून हातपाय बांधून विषाची बॉटल तोंडात टाकली.
मुकुंदवाडी विश्रांतीनगर परिसरातील (पान ५ वर)

Web Title:  The poison of youth is on the rail track