शेतकर्‍यांसाठी पॉकेट डायरी व माहितीपत्रक

By Admin | Updated: May 16, 2014 00:11 IST2014-05-15T23:24:52+5:302014-05-16T00:11:29+5:30

परतूर : शेतकर्‍यांसाठी विविध पिकांवर आधारित पॉकेट डायरी व माहितीपत्रकाचे विमोचन तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Pocket diary and brochure for farmers | शेतकर्‍यांसाठी पॉकेट डायरी व माहितीपत्रक

शेतकर्‍यांसाठी पॉकेट डायरी व माहितीपत्रक

परतूर : शेतकर्‍यांसाठी विविध पिकांवर आधारित पॉकेट डायरी व माहितीपत्रकाचे विमोचन तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. शेतकर्‍यांना विविध पिकांवरील रोग व किड यांची महिती व त्यावरील उपाययोजना यांची माहिती शेतावरच खिशात उपलब्ध व्हावी या उद्देशाने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा या पिकावरील प्राथमिक शत्रू किड व मित्र किड यांची माहिती व त्यावरील नियंत्रण याविषयी माहिती देणारी पॉकेट डायरी व खताची महिती देणारी माहितीपत्रिका यात देण्यात आलेली आहे. खत व्यवस्थापन पिकास वापरावयाच्या प्रतीहेक्टरी मात्रा याबाबत माहिती यात समावेश आहे. या पॉकेट डायरीचे वितरण कृषी सहायकांमार्फत ग्रामसभेत करण्यात येणार आहे. या माहितीपत्रकाचे प्रकाशन तालुका कृषी अधिकारी अरविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी एस. जे.काकडे, आर. ए. उराडे, कृषी सहायक एस. ए. जावळे, एस. एल. पंडित, ए. आर. वावरे,डी.के. बेक्टे, गायकवाड एस. बी. , पी. आर. हनवते, एन. व्ही. सिरसे, एस. ए. अंबुलगेकर, व्ही. एस. जोंधळे, एम. सी. गीनगीने आदी उपस्थित होते. दरम्यान, या डायरीचे संपादन स्वत: तालुका कृषी अधिकारी अरविंद कांबळे यांनी केले आहे. या पुस्तिका शेतकर्‍यांना खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी अधिकारी कांबळे यांनी म्हटले आहे. डायरीचा शेतकर्‍यांनी वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले. (वार्ताहर)

Web Title: Pocket diary and brochure for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.