गुंगीचे औषध फवारून ऐवज लुटला
By Admin | Updated: July 11, 2016 00:27 IST2016-07-10T23:47:54+5:302016-07-11T00:27:14+5:30
बीड : शहरातील सहयोगनगरात गुंगी येणारे औषध तोंडावर मारुन चोरांनी एका घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुंगीचे औषध फवारून ऐवज लुटला
बीड : शहरातील सहयोगनगरात गुंगी येणारे औषध तोंडावर मारुन चोरांनी एका घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मनोज मारुतीराव दोडके हे सहयोगनगरात वास्तव्यास आहेत. त्यांचा शामियान्याचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री जेवण करुन दोडके कुटुंबीय झोपले होते. पहाटेच्या सुमारास खिडकीचे ग्रील तोडून चोरांनी आत प्रवेश केला.
त्यानंतर कपाटातील रोख ७० हजार रुपये, दागिने व दोन मोबाईल असा १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोर पसार झाले. चोरी करण्यापूर्वी चोरांनी घरात गुंगी येणाऱ्या औषधाची फवारणी केली. त्यामुळे घरातील सदस्य मुर्च्छित अवस्थेत राहिले, असा दावा दोडके यांनी केला आहे. शहर पोलिसांनी पंचनामा करुन गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, श्वानपथकास पाचारण केले होते; परंतु पावसामुळे चोरांचा माग काढण्यात श्वानपथकालाही यश आले नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फौजदार कैलास बेले यांनी गुंगीचे औषध फवारल्याचे स्पष्ट होत नाही, असे सांगितले. औषध फवारल्याचा कुठलाही सुगावा हाती लागला नाही, असेही ते म्हणाले. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)