प्लॉटिंगमध्ये फसवणूक; २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 14, 2016 00:26 IST2016-10-14T00:26:19+5:302016-10-14T00:26:59+5:30

जालना : प्लॉटिंग योजनेत फसवूणक केल्याप्रकरणी २४ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला.

Plotting fraud; 24 cases filed against them | प्लॉटिंगमध्ये फसवणूक; २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्लॉटिंगमध्ये फसवणूक; २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना : शहराजवळील खरपुडी शिवारातील गट क्रमांक ७७ आणि ८० मध्ये भाग्यलक्ष्मी रेसिडेन्सी नावाने सोडत पध्दतीने प्लॉटिंग योजनेत संपूर्ण हप्ते भरूनही प्लॉट नावावर न करता फसवूणक केल्याप्रकरणी सुरेश देवावालेसह जवळपास २४ जणांविरूध्द तालुका जालना पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल झाला.
खरपुडी शिवारातील भाग्यलक्ष्मी रेसिडेन्सी नावाने सुरेश देवावाले व इतरांनी प्लॉटिंग योजना सुरू केली. ज्यात १२०० स्क्वेअर फुटांचे १५१ प्लॉट पाडण्यात आले होते. हे प्लॉट संबंधितांना हप्त्याव्दारे देण्यात येत होते. एकूण ८ हप्ते संबंधितांना भरायचे होते. पहिला हप्ता ६०,००० रूपये व त्यानंतर प्रत्येकी ५० हजार रुपये व ९ हप्ते असे एकूण ४ लाख २० हजार रुपयांत हा प्लॉट देण्यात येत होता. प्रल्हाद पांडुरंग भोकरे (रा. सावरगाव हडप) यांनी संपूर्ण हप्ते भरूनही त्यांच्या नावावर प्लॉट न करता त्यांची फसवणूक करून, विश्वासघात केल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. प्लॉटिंग करताना शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोपही फिर्यादीत केला आहे.
याबाबत प्रल्हाद पांडुरंग भोकरे यांच्या फिर्यादीवरून सुरेश देवावाले (रा.खरपुडी), कमलेश सुरेशजी कवराणी, सुनील कवराणी, नंदलाल किशनलाल मेघावाले, समाधन सर्जेराच शेजुळ, परमेश्वर भास्करराव शिंदे, कष्णा पांडुरंग भंडवगणे, गोपाल दोडीया, वसंत भानुदास जाधव, सुरेश मेघावाले, संजय जाधववाणी, साहेबराव कोरडे, भरत शेजुळ, मयूर कटारीया, नरेश देवावाले, राजू लोंढे पाटील, चत्रभुज शेजुळ, बाळासाहेब देशमुख, धरमचंद, नवलचंद कचरूजलाल दुग्गड, सचिन यांच्याविरूध्द गुरूवारी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख करत आहेत.

Web Title: Plotting fraud; 24 cases filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.