मोंढ्यातील व्यापाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्या प्लॉट

By Admin | Updated: October 26, 2016 01:02 IST2016-10-26T00:50:07+5:302016-10-26T01:02:44+5:30

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने मोंढ्यातील व्यापाऱ्यांना जाधववाडीत किराणा दुकान उभारण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्लॉट देण्याचा निर्णय घ्यावा,

Plot to give traders to the plaza till Dec 31 | मोंढ्यातील व्यापाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्या प्लॉट

मोंढ्यातील व्यापाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत द्या प्लॉट


औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने मोंढ्यातील व्यापाऱ्यांना जाधववाडीत किराणा दुकान उभारण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्लॉट देण्याचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कृउबाच्या सचिवांना मुंबईत दिले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर मोंढा स्थलांतराचा प्रश्न उफळला आहे. मोंढ्यात येणाऱ्या जडवाहनांमुळे शहरातील रहदारी खोळंबते यामुळे खुद्द पोलीस आयुक्तांनी मोंढ्यात जडवाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते; पण नंतर दिवाळीमुळे २ नोव्हेंबरपर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान मोंढ्यातील (पान २ वर)
मोंढ्यातील व्यापाऱ्यांना जाधववाडीत प्लॉट देण्यासाठी दोन महिन्यांत कृउबाने निर्णय घेण्याचे पणनमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत सांगितले. आम्ही त्या जागेसंदर्भात आजपर्यंत करण्यात आलेली कारवाई व न्यायालयातील याचिका याची सविस्तर माहिती दिली.
विजय शिरसाठ, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Plot to give traders to the plaza till Dec 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.