प्लॉटच्या नोंदी चौकशीच्या फेऱ्यात

By Admin | Updated: July 11, 2016 00:20 IST2016-07-11T00:09:05+5:302016-07-11T00:20:43+5:30

लोहारा : लोहारा येथे ग्रामपंचायत कार्यान्वित असताना झालेल्या प्लॉटच्या नोंदची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना दिले आहेत.

Plot entries are in the investigation round | प्लॉटच्या नोंदी चौकशीच्या फेऱ्यात

प्लॉटच्या नोंदी चौकशीच्या फेऱ्यात


लोहारा : लोहारा येथे ग्रामपंचायत कार्यान्वित असताना झालेल्या प्लॉटच्या नोंदची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना दिले आहेत. त्यामुळे प्लॉटधारकांत एकच खळबळ उडाली आहे.
लोहारा ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सन २०१२ - २०१६ मध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी व काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन ग्रामपंचायतमध्ये प्लॉटच्या बोगस नोंदी केल्या असल्याची तक्रार नगरसेवक श्यामसुंदर नारायणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या नोंदी मासिक ठराव व प्रोसडींगवर न घेता तसेच खरेदीखताच्या पाच टक्के रक्कम न भरता ग्रामपंचायतची आर्थिक बुडवणूक केली असून, याच्या चौकशीची मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना समिती प्रमुख या नात्याने दप्तर तपासणी व सखोल चोकशी करावी तसेच केलेल्या दप्तर तपासणीचा अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आठ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Plot entries are in the investigation round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.