चापानेर येथील बँकेत व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:31+5:302021-06-29T04:05:31+5:30

येथील शाखा व्यवस्थापकाची पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नवीन व्यवस्थापक रुजू झाले नाहीत. सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांची ...

Plight of farmers as there is no manager in the bank at Chapaner | चापानेर येथील बँकेत व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

चापानेर येथील बँकेत व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

येथील शाखा व्यवस्थापकाची पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नवीन व्यवस्थापक रुजू झाले नाहीत. सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आज व्यवस्थापक येतील, उद्या येतील या आशेवर शेतकरी दररोज बँकेत चकरा मारीत आहेत. विशेष म्हणजे १२ महिन्यांच्या आत पीककर्ज नूतनीकरण केले तर, वार्षिक ४ टक्के व्याज आकारले जाते. मुदत संपली तर ते १० ते १२ टक्क्यांनी आकारले जाते. व्यवस्थापक नसल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. येथे तत्काळ नवीन शाखा व्यवस्थापक, कृषी लोन अधिकारी नियुक्त करावा. तसेच रिक्तपदे तत्काळ भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: Plight of farmers as there is no manager in the bank at Chapaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.