बाजारसावंगीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दैन्यावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:41+5:302021-04-22T04:05:41+5:30

बाजारसावंगी : परिसरातील दहा ते बारा गावांतील जनावरांना आरोग्याची सेवा देणाऱ्या बाजारसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. ...

The plight of Bazarsawangi veterinary hospital | बाजारसावंगीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दैन्यावस्था

बाजारसावंगीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दैन्यावस्था

बाजारसावंगी : परिसरातील दहा ते बारा गावांतील जनावरांना आरोग्याची सेवा देणाऱ्या बाजारसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या दवाखान्यात पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

बाजारसावंगी व परिसरातील जनावरांना उपचार मिळावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला आहे. बाजारसावंगी, शेखपूरवाडी, सोबलगाव, दरेगाव, पाडळी, वढोद, कनकशीळ, ममुराबादवाडी, ताजनापूर, रेल या दहा गावांतील आजारी गुरे, दुधाळ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांना उपचारासाठी आणले जाते. मात्र, या दवाखान्यातील कार्यरत असलेले पशुधन विकास अधिकारी यांची इतरत्र बदली झाली आहे, तर सहायक पशुधन विकास अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. येथील वृणोपचारक हे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. यामुळे येथे गेल्या आठ महिन्यांपासून सध्या एकही कर्मचारी नाही. त्यामुळे येथील कार्यालयाचा पदभार खुलताबाद तथा सुलतानपूर येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते येत असल्यामुळे उपचाराविना जनावरांचे हाल होत आहेत. यामुळे येथील दवाखान्यात लवकरात लवकर कर्मचारी नियुक्त करा, अशी मागणी येथील शेतकरी डिगांबर जाधव व राजेंद्र नलावडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट

नाइलाजाने खाजगी पशुवैद्यकाकडे घ्यावी लागते धाव

बाजारसावंगी परिसरातील गावात बहुसंख्य शेतकरी हे दुधाचा धंदा करतात. जर त्यांची दुधाळ जनावरे आजारी पडली तर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना नाइलाजाने खाजगी पशुवैद्यकाकडे जावे लागते. यामध्ये पैसा खूप खर्च होत असल्याने शेतकरी उद्विग्न झाले आहेत. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील तिन्ही रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन जि.प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिले.

फोटो : बाजारसावंगीचे पशुवैद्यकीय रुग्णालय.

210421\20210419_094739_1.jpg

बाजारसावंगीचा पशुवैद्यकीय रुग्णालय.

Web Title: The plight of Bazarsawangi veterinary hospital