शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

सुखद! पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:42 IST

शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी

औरंगाबाद : राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनांबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी होईल. राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर शिष्टमंडळाशी बोलताना म्हणाले.

राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी दीपक कपूर यांच्यासमवेत बैठकीत चर्चा केली. विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे, यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिव्हिल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग करेल, असे ललित गांधी म्हणाले.

ललित गांधी यांनी शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. औरंगाबादहून नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमानसेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरू करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे इ. मागण्यांचा अभ्यास अहवाल सादर केला. राज्यातील जिल्ह्यांना शहराबरोबर जोडण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करावी, असे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी म्हणाले. चेंबरच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या इंधनाच्या मूल्यवर्धित करामध्ये कपात करून तो १ टक्के करावा, असे सुचविले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे : - रत्नागिरी, कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर होणार- शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार- अमरावती विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर. पहिल्या टप्प्यातले ६.५ कोटी प्राप्त- अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार- नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करणार- पुणे -शिर्डी- नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारीपासून अलाइन्स एअर सुरू करणार.- पुणे - औरंगाबाद- नागपूर सेवा १ मार्चपासून

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानnagpurनागपूर