Video : जय हो ! औरंगाबादेत कोरोना लस दाखल; १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 09:18 AM2021-01-13T09:18:42+5:302021-01-13T09:22:39+5:30

Corona vaccine in Aurangabad देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार

Pleasant ! Corona vaccine introduced in Aurangabad | Video : जय हो ! औरंगाबादेत कोरोना लस दाखल; १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

Video : जय हो ! औरंगाबादेत कोरोना लस दाखल; १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर रवानाआरोग्य उपसंचालक कार्यालयात कोल्ड रुम

औरंगाबाद: अवघ्या देशवासीयांचे आणि औरंगाबादकरांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर आज सकाळी (बुधवारी) औरंगाबादेत दाखल झाली. देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. औरंगाबादसाठी बुधवारी पहाटे पुण्याहून लस घेऊन वाहन सकाळी ९ वाजेच्या सुमारास लस शहरात दाखल झाले. औरंगाबादेत लस दाखल झाल्यानंतर या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात या लसी ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लस दाखल झाल्या. तसेच लातूर आरोग्य उपसंचालक विभागासाठीही लस दाखल झाल्या.

आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोल्ड रुम
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यात कोल्ड रुमचे युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहायक संचालक डॉ. प्रदीप मुरंबीकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते या कोल्ड रुमच्या कामाची पाहणी केली होती.

Web Title: Pleasant ! Corona vaccine introduced in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.